लंडन ः प्रतिनिधी
सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे, भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळाले. विश्वचषक स्पर्धेसाठी 15 जणांचा संघ घोषित करताना एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने पंतला डावलून दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले. मात्र ही संधी नाकारल्यानंतर आपल्यामध्ये सकारात्मक बदल झाल्याचे ऋषभ पंत म्हणाला. सुरुवातीच्या संघात माझी निवड झाली नव्हती, त्यावेळी माझ्या कामगिरीत काही उणीव राहिली असेल, असे मला वाटले. मात्र यानंतर मी अजून सकारात्मक झालो. माझा खेळ अजून कसा सुधरवता येईल, याकडे लक्ष दिले.
आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध खेळत असताना मी चांगली कामगिरी केली, त्यानंतरही मी सराव सुरु ठेवला. याचाच मला फायदा झाला. पंत आपला सहकारी चहलशी संवाद साधत होता.