Breaking News

सचिन, तू वर्ल्डकप जिंकलास तो धोनीमुळेच

नेटिझन्सकडून तेंडुलकर ट्रोल!

साऊदॅम्पनट ः वृत्तसंस्था

भारतीय संघाचे सलामीवर अपयशी ठरले की कोणतं संकट ओढावू शकते, याची प्रचिती अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात आली. विराट कोहली व केदार जाधव वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. मधल्या फळीत विजय शंकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी निराश केले. अफगाणिस्तानविरुद्ध भारताला केवळ 224 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संथ खेळी खेळणार्‍या महेंद्रसिंग धोनीवर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने टीका केली. त्याच्या या टीकेला चाहत्यांनी सडेतोड उत्तर दिले. सचिन तू वर्ल्ड कप जिंकलास तो धोनीमुळेच, असा खोचक टोमणाही अनेकांनी मारला आहे. त्यामुळे धोनीवर टीका करणे तेंडुलकरला महागात पडले. अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत 26व्या षटकात धोनी फलंदाजीला आला. पण, त्याचा खेळ इतका संथ होता की चाहतेही त्याच्या बाद होण्याची प्रतीक्षा पाहू लागले. धोनीने या सामन्यात 52 चेंडूंत 28 धावा केल्या. मधल्याफळीत धोनी व जाधव यांनी 57 धावांची भागीदारी केली, परंतु धावांचा वेग फारच संथ होता. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तेंडुलकरनेही धोनी व जाधवच्या संथ भागीदारीवर नाराजी प्रकट केली. तो म्हणाला, मी निराश झालो, यापेक्षा चांगली खेळी करता आली असती. धोनी व जाधव यांच्या भागीदारीवर मी असमाधानी आहे. ती अत्यंत संथ भागीदारी होती. आम्ही फिरकीपटूंच्या 34 षटकांत केवळ 119 धावाच करू शकलो. याचा गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.

Check Also

महाराष्ट्र सिनिअर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

विजेत्यांना पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तबॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडच्या वतीने, रामशेठ ठाकूर …

Leave a Reply