Breaking News

मुस्लीम बांधवांचा भाजपत प्रवेश

मुरुड : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाबद्दल अल्पसंख्याक समाजामध्ये असलेले गैरसमज दूर केले जातील. सबका साथ सबका विकास याचबरोबर सबका विश्वाससुद्धा संपादन केला जाणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी मुरुड येथे केले.

भाजपचे तालुका उपाध्यक्ष महेश मानकर यांच्या प्रयत्नाने मुरुड शहर व ग्रामिण भागातील अनेक प्रतिष्ठीत मुस्लीम बांधवांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदू एज्यकेशन सोसायटीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पक्षप्रवेश केलेल्या मुस्लीम बांधवांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते  संजय कोनकर, मुरुड तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, उपाध्यक्ष महेश मानकर, जगदीश पाटील, शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, शैलेश काते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समाजसेवक जाहिद फकजी, शब्बीर पालोजी, वसीम नाडकर, डॉ. मुश्ताक शीघ्रेकर, तंजीम कासकर, सिद्धी अमीर खांजादा, सिद्धी इम्रान सुभेदार, अदनान आगा, आदींनी त्यांच्या समर्थकांसह यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. जाहिद फकजी यांची भाजप अल्पसंख्याक सेलच्या मुरुड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून,  त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply