Breaking News

इंग्लंडचा पराभव ‘त्यांना’ आशेचा किरण

लंडन : वृत्तसंस्था

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पटकावला. न्यूझीलंड आणि भारत उंबरठ्यावरच आहेत, परंतु चौथ्या स्थानासाठी आता इंग्लंडसह आणखी तीन संघ आहेत. इंग्लंडचा हा पराभव बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना आशेचा किरण दाखवणारा ठरला आहे.

श्रीलंकेपाठोपाठ यजमान इंग्लंड संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाकडूनही हार पत्करावी लागली. या पराभवामुळे इंग्लंडचा वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. इंग्लंडला आता उर्वरित दोन्ही सामन्यांत भारत आणि न्यूझीलंड यांना पराभूत करावे लागणार आहे, तर इंग्लंडच्या या पराभवाने श्रीलंका, बांगलादेश व पाकिस्तानच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply