मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – रसायनी व आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी रेगे हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 30) दुपारपर्यंत करण्यात आले होते. या शिबिराचा रसायनी व आसपासच्या परिसरातील 50 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी रेगे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या विविध तपासण्या करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात ब्लडप्रेशर, डायबेटिस, एचबी, आरबीएस, इसीजी, बीएमडी, पाठदुखी, कंबरदुखी आदी तपासण्या मोफत केल्या गेल्या. या शिबिराचा 50 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. त्यांना तपासणीनंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना हॉस्पिटलच्या वतीने हेल्थकार्ड देण्यात आले. या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर रविराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आतिष जाधव व डॉ. शर्मा यांनी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले.