नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी बोलताना लाराने भारतात मला मिळालेल्या प्रेमाने व आपुलकीने मी भारावून गेलो असून, हे प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहिल, असे सांगितले.नेरूळ येथे झालेल्या समारंभात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते लाराला पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभास संस्थेच्या विश्वस्त शिवानी पाटील, क्रिकेटपट्ट अॅबी कुरुविला, विद्यापीठाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper