लंडन : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये दुसरा उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकात 223 धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने 85 धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (46) आणि मिचेल स्टार्क (29) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक मार्यापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ 223 धावाच केल्या आणि इंग्लंडला 224 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा निर्णय काही प्रमाणात फसला. फिंच, वॉर्नर आणि हँड्सकॉम्ब हे तिघे अवघ्या 14 धावांत बाद झाला. पण स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. कॅरी 46 धावांवर बाद झाल्यावर स्मिथने डाव पुढे नेला आणि 85 धावांची झुंजार खेळी केली.