पनवेल ः रामप्रहर वृत्त – वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील लाईट खांबांना प्रोटेक्शन कव्हर बसविण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये लाईटच्या खांबांना लागणार्या विजेच्या झटक्यामुळे होणार्या दुर्घटनांना टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा शुभारंभ उलवे नोडचे कार्यकारी अभियंता अविनाश राठोड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 22) झाला.
पावसाळ्यामध्ये विजेच्या खांबांना हात लागून विजेचा झटका लागण्याच्या घटना घडतात. त्या दुर्घटना होऊ नयेत, या साठी वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील विजेच्या खांबांना प्रोटक्शन कव्हर वहाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसविण्यात आले आहे. या कामाच्या शुभारंभावेळी वहाळ ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, भाजप नेते बामण डोंगरी गाव अध्यक्ष नंदू ठाकूर, अमित घरत, सुनिल पाटील, गणेश पाटील, प्रवीण पाटील, निलेश ठाकूर, उदय ठोकळ, निकेश घरत, साहिल पारंगे, अमित पाटील भावेश दापोलकर, किशोर पाटील, अमर पाटील, प्रशांत कडू, ग्रामसेवक नारायण केणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper