Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून देवद, लोनीवली, बारापाडा, बानुबाईवाडी, जुई येथे वह्यावााटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने पनवेल तालुक्यातील देवद आणि लोनीवली येथे वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत देवद आणि लोनीवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आल्या. हा वह्यावाटपाचा कार्यक्रम भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यतेखाली संपन्न झाला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, उपसरपंच संतोष शेळके, माजी सरपंच सुधीर पवार, सतिष मालुसरे, संपदा पालव, सुवर्णा पाटील, संतोष पाटील, प्रविण पालव, इंद्रायणी पाटील, प्रमोद भिंगारकर, हरिश्चंद्र वाघमारे, अश्विनी वाघमारे, विनोद वाघमारे, जगदिश वाघमारे, माजी सरपंच संजय पाटील, कैलास वाघमारे, प्रविण वांगारे यांच्यसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिथ होते. या वेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील बारापाडा आणि बानुबाईवाडीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारी मोफत वह्यावाटप करण्यात आल्या. याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण पाटील, युवानेते योगेश पाटील, उमेश पाटील, बाळाराम गावंड, बानुबाईवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा तांगडे, बारापाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राकेश पाटील, शिक्षक युसूफ मुकादम, गोपाळ गावंड, कविता गावंड, संतोष म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भाजपच्यावतीने जुई राजिप शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास नगरसेवक अरुणकुमार भगत, विकास घरत, शा. व्य. समिती जुईचे अध्यक्ष हनुमान जोशी, उद्योजक अशोक भोपी, चंद्रकांत कडू, अरुण गोवारी, मानाजी पाटील, वैभव भोपी, रमाकांत गोवारी, मुख्याध्यापक अनंत कमाने, आदि मान्यवर ग्रामस्थ तसेच मोतीराम पोकळे, निळकंठ नागरगोजे, सुजाता माने, शैलजा महामुनी, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply