Breaking News

आनंद शाळेत सर्प छायाचित्र प्रदर्शन

खोपोली ः येथील आनंद शाळेत सर्प संवर्धन व त्यासंदर्भात वैज्ञानिक माहिती विद्यार्थी व पालकांना मिळावी यासाठी छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. सर्प संवर्धन व प्रोटेक्शन या निसर्ग संस्थेतर्फे हे सर्प छायाचित्र प्रदर्शन आयाजित केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही या वेळी विशेष उपस्थिती दर्शवली. या वेळी विद्यार्थांची सापांच्या कृष्णधवल छायाचित्रावरून साप ओळखण्याची स्पर्धा घेण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना सर्प संस्थेचे सदस्य प्रदीप कुळकर्णी यांनी लिहिलेले ‘साप आपला मित्र’ हे पुस्तक भेट देण्यात आले. खोपोलीतील पर्यावरण मित्र जयेश अभाणी यांनी ही पुस्तकके पुरस्कृत केली होती. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय केळकर यांनी अभाणी यांचे आभार मानले. हे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल आनंद शाळेच्या अध्यक्षा आसावरी दंडवते व मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी यांचेही सर्प संस्थेचे अध्यक्ष संजय केळकर व सदस्य प्रदीप कुळकर्णी, प्रवीण तावडे यांनी आभार मानले.

माथेरानमध्ये रस्ते बचाव मोहीम

माथेरान ः मातीची होणारी धूप आणि त्यातून गटारे साफ न केल्यामुळे पावसाळी पाणी रस्त्यावरून वाहत असते. त्यामुळे बहुतांश ठिकाणी महत्त्वाच्या पॉइंट्सकडे जाणार्‍या रस्त्यांना एखाद्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते बचाव मोहिमेत चार दिवस श्रमदान होत आहे. माथेरानच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच चार दिवस श्रमदान कार्यक्रम पार पडत असून त्यास नागरिक स्वेच्छेने सहभागी होत आहेत. पर्यावरणबाबतीत संवेदनशील असलेले माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी पर्यावरण संवेदनशील नागरिक संघाच्या माध्यमातून ग्रामस्थांसोबतच सुरू केलेल्या रस्ते बचाव मोहिमेमुळे खरोखरंच हातरिक्षा ओढणार्‍या कष्टकरी श्रमिकांच्या वेदना निवळणार आहेत. पर्यटकांनासुद्धा पदभ्रमंती करताना निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद उपभोगता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply