Breaking News

कृतज्ञ राहिलात तर सुख-समाधान लाभेल -प्रल्हाद पै

कडाव ः वार्ताहर

आपल्याला प्रत्येकात व प्रत्येक गोष्टीत चांगले पाहता आले पाहिजे, तसेच आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल समाधान वाटले पाहिजे, असे प्रतिपादन प्रल्हाद पै यांनी कृतज्ञता सोहळ्यात संबोधित करताना केले. कृतज्ञ राहिलात तर आयुष्यात सुख-समाधान लाभेल. वस्तू, वास्तू, वस्तुस्थिती व नाती याबद्दल आपणास कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी केले.

या वेळी सद्गुरू वामनराव पै यांच्या पत्नी मातृतुल्य माई यांच्या हस्ते दीपस्तंभ या जीवनविद्येचे मुखपृष्ठ असलेल्या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास कर्जत नगरपालिकेच्या नगरसेविका ज्योती मेंगाळ, भारती पालकर, सुवर्णा निनघे, पुष्पा दगडे, मधुरा चंदन, नगरसेवक संकेत भासे, बळवंत घुमरे, शिवसेना रायग़ड जिल्हा सल्लागार भरतभाई भगत, रायगड उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांची उपस्थिती लाभली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply