Breaking News

कारचा पाठलाग करून दोन दरोडेखोरांना पकडले

पेण : प्रतिनिधी

पेण पोलिसांनी फिल्मीस्टाईल कारचा पाठलाग करून दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याची घटना शुक्रवारी (दि. 26) मध्यरात्री घडली. या वेळी एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

पेण शहर व परिसरात झालेल्या चोर्‍यांच्या घटनांची नोंद घेत पालिसांनी रात्रीची गस्त वाढवून गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे. शुक्रवारी रात्री गस्तीदरम्यान साडेतीनच्या सुमारास पोलिसांना एका इको कारमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यामुळे पोलीस पथकाने या कारचा पाठलाग सुरू केला. आंबेगाव येथील पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी ही कार अडवताच आतील दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखलही गोळीबार केला व दोन दरोडेखोरांना पकडले. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन एक जण जंगलात पळून गेला.

घटनेचे वृत्त समजताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व गुन्हे अन्वेषण विभागाच्या रायगड शाखेचे पथक पेण येथे दाखल झाले. या कारची पोलिसांनी झडती घेतली असता, आत धारदार शस्त्रे आढळली. दरोडेखोरांनी वापरलेली कारसुद्धा चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण पाच जणांपैकी दोघांना पकडण्यात आले असून, या गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply