पनवेल : बातमीदार
पनवेलमध्ये 4 ऑगस्टला विशेष बालवयोगटासाठी मिनी जलद चषक राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा व खुल्या गटासाठी मिनी ब्लिट्झ (अती जलद) चषक अशा दोन स्पर्धांचे आयोजन विरुपाक्ष मंगल कार्यालय सभागृहात करण्यात आले आहे.
अस्मिता चेस अॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मागील चार राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये एक हजार 500हून अधिक स्पर्धकांचा व शेकडो पालकांचा सहभाग लाभला होता. अशा स्पर्धांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा म्हणून पाचव्या स्पर्धेत 8, 10, 13, 15, 25 वयोगटाखालील, दिव्यांग व फिडे मानांकित खेळाडू भाग घेऊ शकतात. स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा सहा ते आठ फेर्यांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. ओरीयन मॉलचे मनन परुळेकर यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper