Breaking News

नागोठणे पूर्वपदावर; लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज

नागोठणे : प्रतिनिधी

शहरात रविवारी आलेला पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या घराची तसेच दुकानांची साफसफाई करण्यास सुरुवात केली होती. लोकांनी दुसर्‍या दिवशीसुद्धा स्वच्छता मोहीम राबविली होती.

भिजलेला माल तसेच घरातील खराब कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार सोमवारी (दि. 5) कामाला लागल्याने दुपारपर्यंत बहुतांशी बाजारपेठ तसेच कोळीवाडा भाग स्वच्छ करण्यात यश आले होते. पूरग्रस्त भागात नाले तसेच गटारात औषधी पावडर टाकण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून करण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे रविवारी सायंकाळपासूनच नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी सकाळपासून बाजारपेठेतील दुकानांचे पंचनामे करण्यास प्रारंभ केला असल्याचे येथील महसूल खात्याचे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल यांनी स्पष्ट केले.

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply