Breaking News

विराट बनला ‘हेल्थ गुरू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेससाठी किती जागरूक असतो हे सर्वांना माहीत आहे. फिटनेससाठी तो खास डाएट प्लानही फॉलो करतो. अनेक मुलाखतींमध्ये विराटने आपल्या फिटनेसचे रहस्य उलगडले आहे. असाच एक व्यायाम करतानाचा व्हिडीओ विराटने नुकताच ट्विट केला आहे. या व्हिडीओत त्याने फिटनेस फंडा सांगितला आहे.

चाहत्यांसोबत आपल्या संघातील खेळाडूंनाही फिटनेस कशी राखावी याबाबत विराट सांगत असतो. जिममध्ये घाम गाळातानाचे व्हिडीओ विराटने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओतून तरुणांना व्यायाम करण्यासाठी तो नेहमी प्रोत्साहन देत असतो. नुकताच त्याने व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ ट्विट केला. यात तो 2016 आणि 2019 अशा दोन वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना दिसतो.‘कधीही वजन उचलण्यापूर्वी त्यासाठी लागणारे योग्य तंत्र शिकून घ्यावे. कोणतेही नवीन तंत्र शिकण्यासाठी एकाग्रता व पुरेसा वेळ द्यावा लागतो. मीदेखील गेली तीन वर्षे एकाग्रतेने हे वजन उचलण्याचे तंत्र शिकत आहे आणि आता अनेक दिवसांच्या सरावानंतर त्यात मी तरबेज झालो आहे. कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे,’ असे कॅप्शन विराटने त्या व्हिडीओला दिले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply