Breaking News

ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलचे दोन डबे घसरले

नवी मुंबई : ठाणे-वाशीदरम्यान ऐरोलीजवळ रविवारी (दि. 11) लोकलचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने लोकलमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे-वाशी लोकलचे दोन डबे रविवारी सायंकाळी ऐरोलीजवळ गणपती पाडा येथे रुळावरून घसरले. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुटीचा दिवस असल्याने लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती, मात्र संध्याकाळच्या वेळी घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना या लोकल खोळंब्याचा फटका बसला. दरम्यान, रेल्वे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रान्स हार्बर मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply