Breaking News

खारघरमध्ये झाड उन्मळून पडले

पनवेल : खारघर सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर शाळेजवळ सोमवारी सकाळी झाड उन्मळून पडले. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने याठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ नव्हती. खारघरमध्ये सध्याच्या घडीला अशाप्रकारे झाड उन्मळ ून पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. मागील रविवारी खारघर सेक्टर 12मधील रायन इंटरॅशनल स्कूलजवळ देखील अशाच प्रकारे शाळेच्या सुरक्षा भींतीवर झाड कोसळले होते. सुट्टी असल्याने या ठिकाणी मोठा अनर्थ टळला आहे. खारघरमध्ये 25 पेक्षा जास्त शाळा-महाविद्यालय आहेत. अनेक ठिकाणी आजही अशाप्रकारे झाडे कोसळण्याचा धोका कायम असल्याने सिडको, पालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी मनेश पाटील यांचे म्हणणे आहे.

घरफोडीत रोख रक्कम लंपास

पनवेल ः पनवेल शहरातील दोेन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत रोख रक्कम लंपास झाल्याची घटना घडली आहे. शहरातील तक्का येथील नॅशनल रेसिडेन्सी असलेल्या इन्कॉम एक्स्प्रेस कंपनीच्या कार्यालयातील शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून जवळपास एक लाख 13 हजार 76 रुपयाची चोरी केली आहे. तर दुसर्‍या घटनेत मिडल क्लास हौसिंग सोसायटी येथे असणार्‍या प्लॉट नं. 35 येथेही घरफोडी झाली.

महेश साळुंखे यांचा वाढदिवस साजरा

पनवेल ः रिपाइं डेमोक्रेटीक पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम हाती घेण्यात आले होते. या निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह तसेच रिपाइं डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्रीय नेते कनिष्क कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष हिरामण साळवी, विलास साळवे, राजन सूर्यवंशी, निलिमा पवेर, सुरेखा कोळी, मुमताज पठाण आदींसह सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रजापती समाज मंडळाकडून वृक्षारोपण

पनवेल : नवीन पनवेलमधील प्रजापती समाज विकास मंडळाच्या वतीने नवी मुंबई येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला. यावेळी सी. पी. प्रजापती, विनोद प्रजापती, संध्या चौहान, पूनम प्रजापती, विजय लक्ष्मी, विपिन पासवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

उरण ः रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने इयत्ता आठवी ब या वर्गाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्या साधना डोईफोडे यांनी भूषविले. आठवी बमधील विद्यार्थी प्रतिकेश मुरकुटे व समृद्धी कणसे या विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या झुंजार बाण्याच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाचा जीवनालेख आपल्या भाषणांतून मांडला. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत को-ऑपरेटीव्ह बँकेचे संचालक तथा संस्थेचे लाईफ वर्कर प्रमोद कोळी, ज्यु. कॉलेजचे विभागप्रमुख प्रा. पी. बी. पाटोळे, प्रा. यु. डी. पाटील, प्रसन्न ठाकूर, गणेश भोईर, सागर रंधवे व अन्य रयतसेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी रुपाली पाटील हिने केले. वर्गशिक्षिका द्रौपदी वर्तक यांनी आभार मानले.

राहुल चिपळेकर यांना विज्ञान शिक्षक पुरस्कार

पनवेल ः रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत कर्मवीरांचे वडील पायगोंडा पाटील यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कारासाठी रायगड विभागातील न्यू इंग्लिश स्कूल कामोठे येथील उपशिक्षक राहुल बाळाराम चिपळेकर यांची निवड करण्यात आली आहे. सातवी राष्ट्रीय विज्ञान शिक्षक परिषद, फरीदाबाद येथे त्यांची शोधनिबंध सादरीकरणासाठी निवड झाली होती. सध्या ते रयत विज्ञान परिषदसाठी रायगड विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply