मुंबई : प्रतिनिधी
क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नुकताच मुंबईत झला. या वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीने तुझ्या शतकांचा विक्रम मोडला तर? असा प्रश्न विचारण्यात आला असता सचिन म्हणाला, ज्या दिवशी विराट माझा विक्रम मोडेल, त्या दिवशी मी स्वतः जाऊन त्याला शँपेनची बाटली देईन. आम्ही दोघे एकत्र बसून शँपेन पिऊ. या उत्तराला उपस्थित प्रेक्षकांनीही प्रतिसाद दिला.
वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्या वन डे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळीची नोंद केली. वन डे क्रिकेटच्या कारकिर्दीतील विराटचे हे 42वे शतक ठरले आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये 49 शतके जमा आहेत. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी विराटला आणखी आठ शतकांची गरज आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper