पनवेल : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल व पनवेल इंडस्ट्रियल को. ऑपरेटीव्ह इस्टेट लि., पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे पनवेल इंडस्ट्रियलचे अध्यक्ष विजय लोखंडे, विशेष अतिथी कामगार कल्याण केंद्राचे मा. अरविंद मोरे, पनवेलचे केंद्रप्रमुख प्रवीण सकट, प्रशांत वाघमारे, वीरेंद्र श्रीवास्तव, सुनील सूचक, गौरव जोशी, प्रकाश भंडारे, कृतार्थ पटेल, विजय देशमुख, दत्तात्रय सावंत, दिप लोखंडे, हेमंत पाटील, श्रीमती शोभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.