म्हसळा : प्रतिनिधी
रक्षाबंधन पर्व-नारी शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने म्हसळ्यातील कुणबी समाज सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला.
भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य कृष्णा कोबनाक, महिला मोर्चा संयोजक हेमा मानकर, सहसंयोजक यशोधरा गोडबोले, जिल्हा चिटणीस प्राजक्ता शुक्ल, मिना टिंगरे यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. म्हसळा पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रियांका शिंदे, महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रूपाली भायदे, धनश्री मुंडे, सल्लागार कल्पना कोठावले, आशा पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष गणेश बोर्ले, सरचिटणीस तुकाराम पाटील, प्रकाश रायकर, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे, चिटणीस अनिल टिंगरे, युवामोर्चा तालुका अध्यक्ष शरद चव्हाण, मनोहर जाधव, समीर धनसे, प्रशांत महाडिक, रावजी घाणेकर, राकेश हेलोंडे, प्रल्हाद महाडिक यांच्यासह कार्यकर्ते यांनी मेळावा यशस्वी केला.
भाजपकडूनच कामे
या मतदारसंघात भाजप सरकारने सर्वाधिक कामे केली आहेत, खासदार निधीतून एक रुपयांचेही काम अद्याप सुरू झालेले नाही. तरीही लोकांना खोटे सांगून खासदार सुनील तटकरे व त्यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे हे दोघे या कामांचे श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत, अशी टीका कृष्णा कोबनाक यांनी या
वेळी केली.