Breaking News

टेबल टेनिसमध्ये ‘सीकेटी’ची मनाली विजेती

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाची विद्यार्थिनी मनाली राजेंद्र चिलेकर हिने विजेतेपद पटकाविले.

नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत सीकेटी विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकणार्‍या मनाली चिलेकर हिने मुलींच्या 10 वर्षाखालील गटात विजेतेपद जिंकले.

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनालीचे अभिनंदन केले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply