पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यात भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, जिर्णे ग्रामपंचायत हद्दीतील चाफेगणी आदिवासीवाडीवरील परशुराम हरी फसाले, दामा परश्या वाघ, परश्या पांड्या पिंगळा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 21) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे माजीमंत्री रविशेठ पाटील यांनी स्वागत केले. जिर्णे ग्रामपंचायत निवडणूकीच्या तोंडावर शेकापला हा मोठा धक्का असल्याचे जानकरांचे मत आहे.
माजीमंत्री रविशेठ पाटील यांच्या पेण येथील वैकुंठ निवासस्थानी बुधवारी सकाळी झालेल्या या पक्षप्रवेशाच्यावेळी भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील, तालुका उपाध्यक्ष परशुराम तांबोळी, भाजप युवामोर्चा तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, गागोदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सिताराम पाटील उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper