Breaking News

उरण देऊळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन्मानित

उरण ः वार्ताहर

पोलीस आयुक्त परिमंडळ-2 पनवेल विभागातून विघ्नहर्ता 2018चा सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाचा प्रथम क्रमांकाचा मान उरण शहरातील देऊळवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मिळाला. पुरस्कार आणि प्रशस्तिपत्रक देऊन या मंडळाला गौरविण्यात आले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव विघ्नहर्ता 2018 पुरस्कार वितरण सोहळा नुकताच नवी मुंबईतील वाशी-सिडको ऑडिटोरिअम येथे झाला. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, समाज प्रबोधन, सांस्कृतिक संवर्धन आदी उपक्रमाचे आयोजन करून समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्कृष्ट काम करणार्‍या गणेशोत्सव मंडळाचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत पुष्पगुच्छ, प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान केला जातो.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply