Breaking News

नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

अहमदनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुणोरे येथील एकाच शेतकरी कुटुंबातील चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबाजी विठ्ठल बढे (40), कविता बाबाजी बढे (35) आदित्य बाबाजी बढे (15), धनंजय बाबाजी बढे (13) अशी मृतांची नावे आहेत. बाबाजी बढे यांनी पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या, तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असताना बाबाजी बढे यांच्या गोठ्यातील जनावरे का हंबरत आहेत म्हणून पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती. म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply