Breaking News

कर्जतमध्ये ‘सही पोषण, देश रोशन’ अभियान सुरु

कर्जत : बातमीदार

येथील महिला बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 1) कर्जत पंचायत समिती कार्यालयात उपसभापती काशिनाथ मिरकुटे यांच्या हस्ते पंतप्रधानांच्या ‘सही पोषण, देश रोशन‘ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून पूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम राबवून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

या अभियानात गणेशोत्सव देखाव्यामध्ये जनजागृती करणारे बॅनर्स, पोस्टर लावणे, बालकांबाबत पहिले हजार दिवस जनजागृती करणे, प्रभातफेरी काढून पोषण भागीदारी, पौष्टिक आहार माहिती देणे, सॅम, मॅम बालकांच्या घरी गृहभेटी देऊन अतिसार, परिसर स्वच्छता याबाबत माहिती, सुपोषण-अन्नप्राशन, ओटी भरण दिवसाचे आयोजन करून पथनाट्याद्वारे नाटिका सादर करण्यात येणार आहे. तसेच सायकल रॅली, महिलांच्या आरोग्याविषयी, स्तनपान आदीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

‘सही पोषण, देश रोशन‘ या अभियानाच्या शुभारंभ समारंभास महिला बाल विकास अधिकारी अनिकेत पालकर, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, विस्तार अधिकारी आदिती डमडेरे, पंचायत समिती सदस्या जयवंती हिंदोळा यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. त्यांनी ‘सही पोषण देश रोशन‘ असे लिहलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. या वेळी त्यांनी सामूहिक शपथही घेतली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply