Breaking News

श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम

उरण : वार्ताहर

श्री गणेशोत्सव मंडळ, स्वामी विवेकानंद चौक उरण यांच्या वितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे 33 वे वर्ष असून दर वर्षाप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. विशेष मुलांच्या शाळेत खेळणी व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. आदिवासी वाडी व झोपडपट्टी येथे स्वच्छता जनजागृती, पर्यावरण, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन जनजागृती आदी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्थानिक ब्रासबँड पथकांचे कला सादरीकरण, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, मंगळवारी (दि. 10) महेश बालदी मित्र मंडळ व त्रिलोचन आय केअर (उरण) यांच्या वतीने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप, ऑर्केस्ट्रा, महिलांसाठी पाककला स्पर्धा आदी स्थानिक कलाकार नागरिक यांना प्रोत्साहन देणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे आयोजकांनी सांगितले.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply