Breaking News

सुकापूरमध्ये भाजप अधिक बळकट

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल मतदारसंघात रविवारी (दि. 1) शेकाप नेते माजी सरपंच दत्ता भगत यांच्यासह अनेकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सुकापूरमधील भाजप अधिक बळकट झाला आहे. या वेळी भगवान भगत, बेबीताई भगत, दिनेश भगत, चांगदेव ठाकूर, शांताराम भगत, चांगदेव शेळके, विजय भगत, प्रिया भगत, शाम हंबर्डे, रजनी वाघमारे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदिश गायकवाड, उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी सरपंच एकनाथ भोपी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply