पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडकोच्या 12.5 टक्के योजनेंतर्गत गव्हाण येथे इंटीग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चरचे काम करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
या भूमिपूजनावेळी कामगार नेते महेंद्र घरत, ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील, गव्हाण
ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन भगत, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, कामिनी कोळी, उषा देशमुख, शेखर देशमुख, भार्गव ठाकूर, सिडकोचे अधीक्षक अभियंता आर. जे. गिरी, कार्यकारी अभियंता एस. के. ठक्कर, सहाय्यक अभियंता पूजा भाटकर,
टीआयपीएलचे जनरल प्रोजेक्टर मॅनेजर एम. पी. त्यागी, यल्लू डिग्गे आदी उपस्थित होते.