नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त
येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅन्ड सायन्स स्वायत्त महाविद्यालयात सायन्स असोसिएशनचे उद्घाटन शनिवारी (दि.14) उत्साहात करण्यात आले. या दिवशी ’प्रकल्प आधरित शिक्षण पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे विश्वनिकेतन महाविद्यालय, खालापूरचे प्रा. डॉ. विकास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. बरहटे, उपप्राचार्य डॉ.एस. के. पाटील , सायन्स असोसिएशनच्या प्रमुख प्रा. पी. एम. जाधव उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. डी. बर्हाटे यांनी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. विकास शिंदे यांचे पुष्पगुच्छ देेऊन स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. विकास शिंदे यांनी ‘सध्याची शिक्षण पद्धती आणि काळानुसार बदलणारी शिक्षण पद्धती’ याचे महत्त्व पटवून दिले. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक समस्या भेडसावतात. जसे की की इमारत कोसळणे, अपघात होणे इत्यादी, अशा समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जागरुक असणे गरजेचे आहे. त्यावर संशोधन करून समस्यांचे निवारण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. शिंदे यांनी केले. अशा समस्यांवर मात करून विद्यार्थ्यांनी समाजात आदर्श ठेवला पाहिजे अशा शब्दांत प्रोत्सहीत प्रोत्साहित केले. या प्रसंगी ’सायन्स हेराल्ड’ या परिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याच बरोबर या दिवशी ’लोगो डिझाइनिंग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यकमा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.डी. बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक वर्ग, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.