शिक्षणप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षणप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले असून, पनवेल तालुक्यातील 36 शाळांच्या दुरुस्तीला जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
पनवेल तालुक्यातील शाळांच्या इमारती बिकट असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजना प्राथमिक शाळांच्या विशेष दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदांना अनुदान (2202 एच 614) सन 2019-20नुसार या शाळांच्या दुरुस्तीसाठी (99.5 लाख रुपये) प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार व पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या या शाळांना नवसंजीवनी मिळणार असून, त्यांनी याकामी मोलाचे सहकार्य करणारे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत.
महानगर क्षेत्रातील रोडपाली शाळा (3 लाख रुपये), वावंजे पंचायत समिती विभागातील पाले बुद्रुक (2.5 लाख रुपये), नितळस (2 लाख रुपये), वावंजे उर्दू (1 लाख रुपये), वावंजे मराठी (2 लाख रुपये), हेदुटणे (3 लाख रुपये), कोळवाडी (6.35 लाख रुपये), चिंध्रण पंचायत समिती विभागातील महाळुंगी (1 लाख रुपये), मोर्बे (3 लाख रुपये), शिरवली (6.37 लाख रुपये), आंबे तर्फे तळोजे (3 लाख रुपये), वाकडी (2.75 लाख रुपये), बोंडारपाडा (2.78 लाख रुपये), हरिग्राम (2 लाख रुपये), खैरवाडी (2 लाख रुपये), खानाव (3.73 लाख रुपये), करंबेळी तर्फे तळोजे (3.3 लाख रुपये), कोंडप (7.84 लाख रुपये), नेरे पंचायत समिती विभागातील दूंदरेपाडा (3 लाख रुपये), देहरंग (2 लाख रुपये), शिवणसई (3.62 लाख रुपये), धामणी (2 लाख रुपये), धोदाणी (1.98 लाख रुपये), वाघाचीवाडी (2 लाख रुपये), आदई पंचायत समिती विभागातील आदई (3 लाख रुपये), आकुर्ली (2 लाख रुपये), केवाळे (2 लाख रुपये), विचुंबे पंचायत समिती विभागातील मोहो (2 लाख रुपये), वांगणी तर्फे वाजे (1 लाख रुपये), पळस्पे पंचायत समिती विभागातील उसर्ली खुर्द (2 लाख रुपये), शिवकर (3.40 लाख रुपये), कोन पंचायत समिती विभागातील चिखले (2 लाख रुपये), वारदोली ठाकूरवाडी (1.62 लाख रुपये), बेलवली (3.27 लाख रुपये), भिंगार (3.27 लाख रुपये) आणि केळवणे पंचायत समिती विभागातील दिघाटी (2 लाख रुपये) या एकूण 36 शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper