पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाळा खिंडीत प्रवाशांना घेऊन जाणारी पनवेल-महाड शिवशाही बस बुधवारी (दि. 18) अचानक बंद पडली. कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
प्रवाशांनी गच्च भरलेली वातानुकूलित शिवशाही (एम 3802) बस बुधवारी पनवेल आगारातून सुटली खरी, मात्र ती कर्नाळा खिंडीत अचानक बंद पडली, सुरुवातीला प्रवाशांना वाटले की वाहतूक कोंडी, अथवा रस्त्याचे काम सुरू असल्याने बस थांबली असावी, मात्र बराच वेळ बस जागीच थांबल्याचे पाहून प्रवाशांच्या बस बंद पडल्याचे लक्षात आले. मग सारेच प्रवासी खाली उतरले, पण पनवेल आगारातून येणार्या सर्वच बस भरून येत असल्याने त्यांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे प्रवास आरामदायी व्हावा या अपेक्षेने शिवशाही बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची मोठी अडचण झाली, पैसेही गेले आणि हाल झाले, अशाच संतप्त प्रतिक्रिया या प्रवाशांकडून ऐकावयास मिळाल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper