पनवेल : वार्ताहर
कळंबोली वसाहतीमधील एकता अपार्टमेंट ओनर्स असो. येथे गेली 10 वर्षे अंगणवाडी सुरू आहे. त्या ठिकाणी गेल्या 9 महिन्यांपासून विद्युत पुरवठा नसल्याने तेथील अंगणवाडी सेविका व छोट्या मुलांना गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भातील माहिती स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम व शुभांगी निर्मळे यांना मिळताच त्यांनी याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन दिले.
या अंगणवाडीमधील मीटर गेल्या नऊ महिन्यांपासून काढून नेलेला आहे. मार्च अखेर बिल फक्त 150 ते 200 रुपये येत होते. त्यात एप्रिलचे बिल 15000 व मे चे बिल 16000 देण्यात आले व एका महिन्याचे बिल 4000 देण्यात आले. अचानक वाढलेल्या बिलामुळे सदर बिल अंगणवाडी भरू शकलेले नाही. याबाबत त्यांनी स्त्री शक्ती फाऊंडेशनला माहिती दिल्यावर त्यांनी तातडीने वीज वितरण कंपनीचे अधिकारी सोनावणे यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली व मीटर चेक करून नवीन मीटर बसवून द्यावे, तसेच सुधारित बिल द्यावे, अशी मागणी केली. या
मागणीला सकारात्मक प्रतिसाद वीज वितरण मंडळाच्या अधिकार्यांनी दिला.
RamPrahar – The Panvel Daily Paper