Breaking News

पोलीस ठाण्याच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांना सूचना

पनवेल : बातमीदार

या वर्षीचा नवरात्रोत्सव हा आचारसंहिता असल्यामुळे पुरता अडचणीत सापडला आहे. यासाठीच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले वपोनि अजयकुमार लांडगे यांनी पनवेल शहरातील नवरात्रोत्सव मंडळांची बैठक बोलावून त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत त्यांनी यावेळी सूचना केल्या.

ही बैठक सोमवारी (दि. 23) पनवेल शहर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रामुख्याने कोणत्याही सणांवर पायबंध घालण्याचा हेतू नसून अनावधानाने नवरात्रोत्सव मंडळांकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडू नये, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. यामध्ये वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी मंडळांनी घ्यावी, तसेच मंडळाच्या ज्या ठिकाणी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्या ठिकाणी राजकीय बॅनर अथवा देखावे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय लावू नयेत. मंडळाने आपला अर्ज महाराष्ट्र पोलीस या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन भरावा. ध्वनिक्षेपकाची तीव्रता शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेत असावी. नवरात्रोत्सव उत्सव साजरा करीत असताना दुर्गा देवीच्या मूर्तीची उंची जास्त मोठी नसावी याबरोबरच आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यावी आणि आगमन तथा विसर्जन मिरवणूकही योग्य वेळेत सुरू करून योग्य वेळेतच संपवावी, अशा आशयाच्या सूचना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांनी नवरात्रोत्सव मंडळांना दिल्या. या वेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या काटेकोर सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन उपस्थित मंडळांच्या वतीने देण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply