Breaking News

सीकेटी महाविद्यालयातर्फे मतदार जागरूकता चर्चासत्र

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत महाविद्यालयामध्ये मतदार जागरूकता चर्चासत्राचे आयोजन शनिवारी (दि. 5) करण्यात आले. चर्चासत्राच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम  अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी मतदार जागरूकता ही राष्ट्राच्या उभारणीसाठी व लोकशाही बळकटीकरणासाठी किती महत्त्वाची आहे हे सांगितले, तसेच भारतीय राज्यघटना व मानवी हक्क यांच्या संबंधांवर भाष्य केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदार जागृती करण्याचे आवाहन केले, तसेच त्यांनी मतदान करणे हे एक राष्ट्रउभारणीचे माध्यम असून यामध्ये समाजातील सर्व घटकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे यांनी मतदानाचे महत्त्व सांगून मान्यवरांचे आभार मानले. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply