Breaking News

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची स्थापना

अलिबाग : जिमाका

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची (मीडिया सर्टीफिकेशन अ‍ॅण्ड मॉनिटरिंग कमिटी चउचउ) स्थापना करण्यात आली आहे, तसेच प्रत्येक विधानसभा

मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी, पत्रकार जयंत धुळप, अपर जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी निलेश लांडगे हे जिल्हास्तरीय समितीचे सदस्य असून प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली त्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणिकरण समिती स्थापन करण्यात आली असून सदर समितीशी संपर्क साधावा. निवडणूक कालावधीमध्ये प्रचारासाठी देण्यात येणार्‍या टीव्ही चॅनेल, रेडिओ एफएम, केबल्स व वृत्तपत्रातील निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे, बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून त्याबाबत योग्य कारवाई करणे आदी कामे या समितीमार्फत केली जाणार आहेत. माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे टीव्ही चॅनेल, रेडिओ एफएम, प्रचाररथ, सिनेमागृह, सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांच्या ई-आवृत्तीतील (जाहिराती) सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्या

दृकश्राव्य (ऑडिओ-व्हीज्यूअल) जाहिरातींसाठी प्रसारणपूर्व प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज (इंग्रजी किंवा मराठी भाषेतील) दोन प्रतींमध्ये आवश्यक माहिती भरून सादर केला जावा. अर्जासोबत दोन सीडी (सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्या टंकलिखित मजकुरासह दोन प्रती-ट्रान्सस्क्रीप्ट) जोडाव्यात. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण समितीकडे उमेदवारांच्या जाहिरातीचे प्रमाणिकरण करून दिले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील विधानसभेचे उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी (प्राधिकृत असलेले) सदर समितीकडे अर्ज सादर करू शकतात. त्याप्रमाणेच फक्त उमेदवाराच्या वैयक्तिक सोशल मीडियाच्या अकाऊंटवरील पोस्ट, फोटो, व्हिडीओ यांच्यासाठी प्रमाणपत्राची गरज नाही. प्रत्येक ऑडिओ जाहिरात किंवा ऑडिओ-व्हीज्यूअल जाहिरात ही स्वतंत्र असावी.  एकाच सीडीमध्ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नयेत. अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्ता, जाहिरात कोणत्या उमेदवारासाठी आहे, त्याचे नाव, पक्षाचे नाव, जाहिरात कुठे दाखवणार, जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च,  जाहिरातीतील भाषा याचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी तीन दिवस आणि इतर उमेदवार जाहिरात प्रसारणापूर्वी सात  दिवस अगोदर अर्ज करू शकतात. सीडीमधील मजकूर प्रसारणयोग्य असावा. इतरांची बदनामी करणारा, जाती-जातींत धार्मिक तेढ तसेच देशविघातक कृत्याला प्रोत्साहन देणारा मजकूर नसावा.

Check Also

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळेमहिलांच्या जीवनात समृद्धी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे समाजातील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जागा …

Leave a Reply