Breaking News

रविशेठ पाटील यांचा आज नागोठणे विभागात प्रचाराचा शुभारंभ

पेण : प्रतिनिधी 

नागोठणे येथील जोगेश्वरी मातेचे सोमवारी (दि. 7) सकाळी 10 वाजता दर्शन घेतल्यानंतर शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप- शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या नागोठणे विभागातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. माजी आमदार अनिलभाऊ तटकरे, जिल्हा परिषद सदस्य किशोरशेठ जैन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहा तालुका अध्यक्ष समीर शेडगे, सोपान जांबेकर, नागोठणे विभाग अध्यक्ष संजय भोसले व मोरेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील जोगेश्वरी मातेचे दर्शन घेणार आहेत. या वेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मारुती देवरे यांनी केले आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply