Breaking News

द्रोणागिरी किल्ल्यावर स्वच्छता व ध्वजारोहण

उरण : रामप्रहर वृत्त

दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. 8) किल्ले द्रोणागिरीवर स्वच्छतारूपी संवर्धन व भगवा ध्वजारोहण मोहीम क्रमांक 8 पार पडली. या मोहिमेत अनेक शिलेदार सहभागी झाले होते.

सकाळी 9 वाजता किल्ले द्रोणागिरी सर करण्यास सुरुवात केलेल्या शिलेदारांनी किल्ल्यावर पोहोचल्यावर प्रथम साफसफाई केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती व प्रतिमेचे पूजन, तसेच शस्त्रपूजन करण्यात आले. मग शिवघोष करीत मशाली घेऊन मानाचा जरीपटका-भगवा ध्वज नियोजित ठिकाणी फडकविण्यात आला. दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे नवी मुंबई विभाग अध्यक्ष म्हणून चेतन गावंड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply