मुरूड : प्रतिनिधी
येथील सार्वजनिक वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. 15) वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
मुरूड सार्वजनिक वाचनालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाचनालयाचे अध्यक्ष अनिल कारभारी यांनी प्रास्ताविक केले. ‘कोमसाप’चे दक्षिण रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी वाचनाचे महत्त्व विषद केले. वाचनालयाचे उपाध्यक्ष केदार गद्रे यांनी वाचन संस्कृतीची सुरुवात घरापासून व्हायला हवी, असे मत व्यक्त केले. प्रतिभा जोशी, प्रतिभा मोहिले, उर्मिला नामजोशी, प्रीतम वाळंज, नयन कर्णिक, नैनिता कर्णिक, वासंती उमरोटकर, सिद्धेश लखमदे, अच्युत चव्हाण, आशिष पाटील, आशा जोशी, व्यंकटेश काकनाटे आदींनी काव्यवाचन, अभिवाचन व कथाकथन सादर केले. सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह विनय मथुरे व सदस्य या वेळी उपस्थित होते. ग्रंथपाल संजय भायदे यांनी आभार मानले.