Breaking News

महायुतीची बैठक उत्साहात; विजयाचा निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीच्या नेत्यांची बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाली. या वेळी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली.

पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी महायुतीमधील नेते सज्ज झाले आहेत. त्यासंदर्भात ही

बैठक झाली. या बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील, आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य परेश पाटील यांच्यासह महायुतीतील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीची महाशक्ती

पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे. भाजपसोबत शिवसेना, आरपीआय व अन्य मित्रपक्ष एकवटल्याने महायुतीची महाशक्ती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply