पाली : प्रतिनिधी
येथील खडकआळीतील नवतरुण मित्र मंडळाच्या सदस्यांनी सुधागड तालुक्यातील खवली येथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद लुटून त्यांना फराळ तसेच मुलांना बिस्कीट, चॉकलेट व पेनचे वाटप केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य महेश बारमुख, उमेश बारमुख, समीर घाग, पंकज बेलोसे, गणेश जाधव, संदीप घाग, कुणाल चिले, मकरंद लोखंडे, विराज पानकर, राज जाधव, मंथन बेलोसे, राज सावंत व सुजल निंबाळकर आदींनी खवली आदिवासीवाडीत जाऊन फराळ व खाऊवाटप केले. आदिवासी बांधव व लहानग्यांनी या सर्वांचे आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper