Breaking News

पालेभाज्यांचे भाव कडाडले

मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत आवक घटली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

अकाली पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत एकीकडे कांद्याचे भाव कडाडले असतानाच आता पालेभाज्यांचे भावही चांगलेच वधारल्याने गृहिणींचे बजेट मात्र कोसळले आहे. त्यामुळे पालेभाजी खरेदी करावी की नाही या स्थितीत महिलावर्ग आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांबरोबरच ग्राहकांची आर्थिक कोंडी केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ तुर्भे येथील बाजारात दैनंदिनी 300 ट्रकने येणार्‍या पालेभाज्या आता 100 ट्रक भरून इतक्याच येत आहेत. ज्या पालेभाज्या आणल्या जात आहेत त्याही पावसामुळे खराब होत असल्याने घाऊक बाजारात पालेभाज्यांचे भाव दुप्पट तिप्पट झाल्याने किरकोळ बाजारात नवीन उच्चांक गाठला आहे.

सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेतील घाऊक बाजारात मेथी 20 ते 35, शेपू 25 ते 50, पालक 30 ते 35, कांदापात 20 ते 30, कोथिंबीर 20 ते 35 अशा दराने विकली जात आहे. ज्या पालेभाजांची जुडी 10 ते 15 रुपये घाऊक बाजारात मिळत होत्या. त्यांचाच भाव दुप्पट, तिप्पट झाल्याने घाऊक व्यापार्‍यांबरोबरच किरकोळ व्यापार्‍यांच्या तोंडाला फेस आला आहे.

नियमित येणार्‍या भाज्या आता 35 टक्केच  येत आहेत. पावसामुळे आलेल्या भाज्या सडलेल्या असतात. त्या फेकून द्याव्या लागतात. त्यामुळे चांगल्याच पालेभाज्या व्यापारी खरेदी करत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव चांगलेच वाढले आहेत.

-नितीन वाळुंज, भाजीपाला व्यापारी, मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply