


कर्नाळा (ता. पनवेल) : अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ यांची मालिका सरल्यानंतर वातावरणाने आपली कूस बदलली असून, आता थंडीची चाहूल लागली आहे. त्याची दस्तक धुक्याने दिली आहे. पहाटेच्या वेळी हिरव्यागार झाडीवर दवबिंदू जमा झाले असताना या धुक्यातून सूर्यनारायण आपले मोहक दर्शन देतो. निसर्गाची ही विविध रूपे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर यांनी आपल्या कॅमेर्यात टिपली आहेत.
नौसेना आयुध भंडार (एनएडी)चा हीरक महोत्सव

करंजा (ता. उरण) : नौसेना आयुध भंडार (एनएडी)चा हीरक महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते भारतीय डाक विभागामार्फत विशेष टपाल कव्हरचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास नवी मुंबई पोस्टल रिजनच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे, भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल अजित कुमार आणि नौदलाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper