Breaking News

कामोठे महोत्सवाचे शानदार उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्थेमार्फत गेली 10 वर्षे आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे आयोजन करण्यात येत या वर्षीही मोठ्या उत्साहात हा महोत्सव होत असून, त्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) झाले.

सिडकोच्या माध्यमातून पनवेल-उरण परिसरात विविध वसाहतींचे जाळे निर्माण झाले आहे. या परिसरात बाहेरून येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांना येथील स्थानिक संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी आगरी-कराडी महोत्सवाचे आयोजन गेली 10 वर्षे कामोठे येथे करण्यात येत आहे.

या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, दिलीप पाटील, नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, संतोषी तुपे, पुष्पा कुतरवडे, राष्ट्रवादीचे सुरदास गोवारी, अ‍ॅड. मदन गोवारी, भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) लॉ कॉलेजच्या प्राचार्य शितला गावंड, अ‍ॅड. जय पावणेकर, न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन स्वामी म्हात्रे, भाजपचे जेष्ठ नेते विठूशेठ गोवारी आदी उपस्थित होते.

या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मनोगतामध्ये आयोजकांचे कौतुक करीत गेली 10 वर्षे सुरू असलेले हे सामाजिक कार्य आपण भविष्यात असेच चालू ठेवा, अशा शुभेच्छा दिल्या.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply