Breaking News

संजय राऊतांना वेड लागलंय, वेड्यांच्या रुग्णालयात न्यावं लागणार

भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना खासदार संजय राऊत यांना वेड लागले आहे. सत्ता येण्याची वाट पाहतानाच ते वेडे झाले आहेत. लवकरच त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल, अशा शब्दांत भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिले. दानवे यांनी सोमवारी (दि. 25) पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर निशाणा साधला.

संजय राऊत वारंवार भाजप टीका करीत आहेत. राऊत यांनी  भाजपच्या नेत्यांना सत्तेसाठी वेड लागले आहे, असे म्हटले होते. त्याचा दानवे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. सत्ता येण्याची वाट पाहतानाच संजय राऊत यांनाच वेड लागले असून, त्यांना कुठल्यातरी वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, असे दानवे यांनी फटकारले.

काय बोलावे आणि काय बोलू नये हे संजय राऊत यांना अजूनही समजत नाही. राजकीय नाट्यामध्ये शिवसेनेला त्यांचा नेताही शोधता आला नाही. जे कपिल सिब्बल कोर्टामध्ये आज शिवसेनेची बाजू मांडत आहेत त्या सिब्बल यांनी राम हे काल्पनिक आहेत वास्तव नाही असे वक्तव्य केले होते. त्या वेळी सिब्बल यांच्याबद्दल टीका करणारा लेख राऊत यांनीच लिहिला होता. त्या लेखात सिब्बल यांचा उल्लेख माकड असा केला होता. आता त्याच सिब्बल यांची मदत शिवसेना घेत आहे, याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले.

अजित पवार यांनी पाठिंबा दिला तेव्हा ते राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते होते आणि आजही तेच नेते आहेत. त्यांनी काढलेला व्हिप राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाळावाच लागेल, असेही दानवे यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तीन पक्ष आमदारांना बसमधून घेऊन फिरत आहेत, मात्र महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांची चिंता भाजपलाच आहे, असेही दानवे यांनी सांगितले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply