दोन तरुणांचा मृत्यू
पुणे ः प्रतिनिधी : पुण्यात पेस्ट कंट्रोल करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. ढेकूण घालवण्यासाठी खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोल करण्यात आलेल्या खोलीतच दोघे तरुण झोपले होते. सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस तपास करीत आहेत.
दोघे तरुण एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. कॅन्टीन मालकाने दोघा तरुणांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. ढेकणांचा त्रास होत असल्याने खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोल केले असल्याने दोघे तरुण तीन दिवसांसाठी मित्राच्या घरी गेले होते. नंतर पुन्हा ते आपल्या खोलीवर आले होते, पण पेस्ट कंट्रोलचा प्रभाव कमी झाला नसल्याने दोघा तरुणांचा मृत्यू झाला. सकाळी वेळ होऊनही दोघे तरुण कामावर न आल्याने कॅन्टीन मालकाने खोलीत जाऊन पाहणी केली असता दोघे मृतावस्थेत आढळले. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले होते, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper