माणगाव गटविकास अधिकार्यांच्या हस्ते जलपूजन

माणगाव : प्रतिनिधी
पंचायत समिती माणगाव व ग्रुप ग्रामपंचायत भागाड यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव येथील नदीवर श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला असून, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. माणगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन गटविकास अधिकार्यांनी केले आहे. तालुक्यातील भागाड ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तासगाव येथील नदीवर पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या श्रमदानातून 500 सिमेंट पिशव्यांच्या सहाय्याने वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधार्यातील पाणी मेअखेरपर्यंत साठवून ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नुकतेच गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. या वेळी कृषी विस्तार अधिकारी बाळकृष्ण काप, श्री. कटरे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच भागाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper