कामोठे : बेटी बचाओ-बेटी पढाओ, असा संदेश देत एक स्वयंसेवक : एक हौसिंग सोसायटी अंतर्गत रविवारी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी व धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.