मद्यधुंद पाटर्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी

मुंबई : प्रतिनिधी

ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागत पाटर्यांच्या

आयोजनासाठी विविध हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँ सज्ज झाले आहेत, मात्र अशा ठिकाणी होणार्‍या मद्यधुंद पाटर्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

हायकोर्टाने आदेशात म्हटले की, शहरातील हॉटेल्स, पब्ज व रोस्तराँत ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित पाटर्यांत फिल्मी व गैरफिल्मी गाणी परवाना शुल्क व सुरक्षित कॉपीराईट परवानग्या दिल्याशिवाय वाजवता येणार नाहीत. कोणतीही गाणी वाजवण्यापूर्वी आयोजकांनी परवाना शुल्क भरून फोनोग्राफिक परफॉर्मन्सची (पीपीएल) परवानगी घ्यावी.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply