मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेकडे असलेले राज्याचे गृहमंत्रिपद राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद दिल्यास ‘मातोश्री’वरही कॅमेरे लागतील, असा टोला त्यांनी लगावला.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील समझोत्यानुसार गृहमंत्रिपद हे राष्ट्रवादीला देण्याबाबत एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊ केला आहे. अर्थखाते, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गृहखातेपण शिवसेनेने दिले, मग यांनी स्वत:कडे ठेवले काय फक्त मुख्यमंत्रिपद?, असा खोचक सवालदेखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी
30 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेतील, तर काँग्रेसकडून 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …