पनवेल : बातमीदार
कळंबोली सेक्टर 11मध्ये रहाणार्या 19 वर्षीय कॉलेजवयीन तरुणीने खारघर सेक्टर 35 मधील साईस्प्रिंग इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. गुरुशरणजीत कौर जोगासिंग भुल्लर (19) असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुशरण कौर ही तरुणी कळंबोली सेक्टर 11मध्ये नीलसंकुल इमारतीत रहाण्यास होती. तसेच ती खारघर येथील सरस्वती इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. इंजिनीअरिंगच्या दुसर्या वर्षात गुरुशरण कौर काही विषयांत नापास झाली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षेत ती पुन्हा काही विषयांत अनुत्तीर्ण झाली होती. गुरुशरण कौर हिचे नातेवाईक साईस्प्रिंग इमारतीत 13व्या मजल्यावर रहाण्यास असल्याने गुरुशरण कौर रविवारी सायंकाळी नातेवाइकांना भेटण्यासाठी येथे गेले होती.
या वेळी गुरुशरणने 12व्या मजल्यावर उतरून खाली उडी मारली. काही वेळानंतर इमारतीतील रहिवाशांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी गुरुशरणचा मृतदेह ताब्यात घेतला. सीसीटीव्हीची तपासणी केली असता गुरुशरण स्वत: लिफ्टने 12व्या मल्यावर जाऊन तेथून उडी मारल्याचे निदर्शनास आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper